पुणे

अतिक्रमण कारवाई करताना पालिका अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध ; कारवाईचे नाटक सुरू, पत्रकारांशी उद्धट वर्तन अधिकारी “संजय बसंगर” यांना पोलिसांनी झापले

हडपसर / पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
पुणे महानगरपालिकेमार्फत बी. टी. कवडे रोड परिसरात अतिक्रमण कारवाई सुरू आहे अनधिकृत बांधकामे पाडली जात असताना पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी मात्र सुपारी घेतल्याप्रमाणे बांधकामांवर कारवाई करत असून नागरिकांबरोबरच पत्रकारांशी अरेरावी करण्याचा प्रकारमहापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून घडला.
पुण्याच्या पूर्व भागात हजारो अनधिकृत बांधकामे झालेली आहेत यावर पुणे पालिकेचा अंकुश नाही मात्र काही राजकीय वाद व वितुष्ट पाहता पालिकेचे अधिकारी जाणून-बुजून कारवाई करताना दिसत आहेत बी. टी. कवडे रोड परिसरात सलग या महिन्यात दुसरी तिसरी कारवाई झाली महापालिकेचे बांधकाम विभागाच्या अधिकारी संजय बसंगर यांना या भागात कारवाई करण्यात जास्त इंटरेस्ट आहे.
बी.टी.कवडे रोड येथे कारवाई सुरू असताना पत्रकारांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाईची माहिती मागितली तेव्हा उद्धटपणे या अधिकाऱ्याने पत्रकारांनी माहिती देणार नाही, आणि हात हलवुन अपमानित केले. व दुर्लक्ष केले.
यावेळी मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव भोसले यांनी कारवाईच्या ठिकाणी भेट दिली व अधिकार्‍यांना चांगलेच झापले तुम्ही अतिक्रमण कारवाई करता वरिष्ठांना कळविता मात्र मुंढवा पोलीस स्टेशनला कळवत नाही सध्या आचारसंहिता सुरू असल्याने आमच्यावर कामाचा ताण आहे तुम्ही आम्हाला कारवाईसाठी पोलीस बळ मागता पण आचारसंहिता सुरू असताना आम्हाला निवडणुकीकडे लक्ष द्यावे लागते तुम्ही मोठ्या इमारती उभारल्यानंतर अतिक्रमण कारवाई करता या अनधिकृत इमारती उभा राहत असताना तुम्ही झोपा काढता काय? अशा शब्दात या अधिकाऱ्याने पालिकेचे अधिकारी संजय बसंगर यांना झापले
पालिकेचे अधिकारी नागरिक व पत्रकारांचीही उद्धट वागले माहिती देण्यास नकार दिला त्यामुळे पत्रकारांनी त्यांचा निषेध केला व वरिष्ठ अधिकारी बांधकाम विभागाचे श्री. फड यांच्याकडे तक्रार केली असता अनधिकृत बांधकामाची कारवाई सुरू असून त्या अधिकाऱ्यांवर कामाचा ताण असल्याचे सांगितले प्रत्यक्षात अधिकारी संजय पसनकर हे सावलीत टोपी घालून खुर्चीवर निवांत बसलेले होते त्यांना कोणताही ताण जाणवत नव्हता मात्र आर्थिक हितसंबंध जपताना कारवाईचे नाटक करून अधिकारी आपली पोळी भाजून घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

 

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
3 months ago

How do I know who my husband or wife is chatting with on WhatsApp, then you are already looking for the best solution. Eavesdropping on a phone is much easier than you realize. The first thing to install a spy application on your phone is to get the target phone.

3 months ago

Is there a better way to quickly locate a mobile phone without being discovered by them?

Comment here

2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x