“ठाण्यातील Kopri Railway Station बाहेर धक्कादायक प्रकार समोर आला आहे!
मद्यधुंद तरुणांकडून महिलांची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी सतत येत होत्या. वाईन शॉपमधून दारू घेऊन उघड्यावरच पिणे… आणि रस्त्याने जाणाऱ्या महिलांवर अश्लील टिप्पणी करणं… हा प्रकार वाढतच होता.
शेवटी एका तरुणीने धाडस दाखवत WhatsApp ग्रुपवर माहिती शेअर केली… आणि लगेच Shiv Sena कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले!
छेडछाड करणाऱ्यांना चोप देत इतरांना कडक इशारा देण्यात आला. इतकंच नाही तर वाईन शॉप मालकालाही जाब विचारत, दुकानासमोर दारू पिण्यावर बंदी घालण्याची ताकीद देण्यात आली.
या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असला तरी महिलांनी समाधान व्यक्त केलं आहे.
आता प्रश्न एकच—महिलांची सुरक्षितता कोणाची जबाबदारी?”
