पुणे

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सुप्रसिद्ध कायदे तज्ञ  उज्वल निकम यांच्या व्याख्यानाचे आयोजन

हडपसर (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे एस. एम.जोशी कॉलेज व आरोग्य विज्ञान महाविद्यालय, ग्रंथालय क्रीडा शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त “सावित्री सन्मान” व व्याख्यानाचा कार्यक्रम शनिवार दि. 18 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध कायदे तज्ञ उज्वल निकम यांचे “भारतीय संविधान महिलाचे अधिकार ” या विषयावर व्याख्यान होणार आहे.या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा  रूपालीताई चाकणकर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणारआहेत.

रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमदार चेतनदादा तुपे पाटील, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य , दिलीप (आबा) तुपे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. अशी माहिती एस. एम. जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड यांनी दिली.