पुणे

घरासमोर गाडी पार्क? तुमचे हक्क काय म्हणतात कायदा!

तुमच्या घरासमोर कोणी गाडी उभी करत असेल, तर काय करायचं?
सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा — रस्ता हा सार्वजनिक मालमत्ता आहे.
म्हणजेच, “ही माझी जागा” म्हणून तुम्ही कोणालाही पूर्णपणे गाडी उभी करण्यास रोखू शकत नाही.

 

पण…
जर गाडी तुमच्या गेटसमोर उभी करून तुमचा येण्या-जाण्याचा मार्ग अडवला, तर ते कायद्याने चुकीचं आहे.अशा वेळी तुम्ही तात्काळ ट्रॅफिक पोलिसांना कळवू शकता.
पोलीस त्या वाहनावर दंड करू शकतात किंवा गाडी टो (Tow) करून नेऊ शकतात.तसंच, रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्किंगमुळे ट्रॅफिक जाम किंवा त्रास होत असेल,
तर त्यावरही तक्रार करता येते.म्हणजे वाद न घालता, कायद्याच्या मदतीने तुम्ही तुमचा हक्क सुरक्षित ठेवू शकता.