पुणे

“भरदिवसा धक्कादायक घटना! तरुणीचा जीव गेला 😱”

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका तरुणीचा तिच्याच प्रियकराने हल्ला करून खून केल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गणपती मंदिराजवळील पेट्रोल पंपावर घडली. पूजा गावंडे या तरुणी आपल्या कामात व्यस्त असताना तिचा प्रियकर सत्यम गावंडे तेथे आला.

दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला आणि त्या रागातून आरोपीने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला.

घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हे प्रकरण प्रेमसंबंधातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत.

भरदिवसा आणि सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.