“फक्त ५ मिनिटांचा उशीर… आणि एका विद्यार्थ्याचं संपूर्ण वर्ष धोक्यात!
पुण्यातील पार्थ सूर्यवंशी हा विद्यार्थी प्रवेश परीक्षेसाठी वेळेआधीच निघाला होता. पण रस्त्यांची खराब अवस्था आणि वाटेत गाडी बिघडल्यामुळे तो परीक्षा केंद्रावर अवघ्या ५ मिनिटांनी उशिरा पोहोचला.
पण नियम इतके कडक की… त्याला थेट प्रवेश नाकारण्यात आला!
विद्यार्थ्याने विनंती केली, परिस्थिती समजावून सांगितली… तरीही त्याला परीक्षा देता आली नाही.
या घटनेनंतर विद्यार्थी पूर्णपणे खचला… कारण एका छोट्याशा उशीरामुळे त्याचं संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती आहे.
या प्रकरणी Rayat Vidyarthi Vichar Manch आक्रमक झाले आहेत.
संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष Akshay Chavan यांनी शासनाकडे मागणी केली आहे की—
अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्यात यावी!
त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे—
वाहतूक, खराब रस्ते किंवा अचानक आलेल्या अडचणी यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये.
आता मोठा प्रश्न असा—
नियम महत्वाचे की विद्यार्थ्यांचं भविष्य?
हा निर्णय प्रशासन घेणार… पण तोपर्यंत हा विद्यार्थी न्यायाची वाट पाहतोय!”
