पुणे

“पुण्यात उष्णतेचा कहर! 🔥 तापमान ४० अंशांच्या पार जाणार”

पुणे शहरात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या शहरातील तापमान ४० अंशांच्या जवळ पोहोचलं आहे.

मध्यवर्ती पुण्यात कमाल तापमान ३९ अंश नोंदवलं गेलं, तर लोहगावमध्ये पारा ४१ अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

भारतीय हवामान विभागाने १५ एप्रिल रोजी पुण्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढील ४ ते ५ दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

 

मगरपट्टा, हडपसर, विश्रांतवाडी अशा भागांमध्ये उकाडा अधिक जाणवत असून लोक टोपी, स्कार्फ वापरून उन्हापासून बचाव करताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे, रात्रीसुद्धा गारवा कमी झाला असून उकाडा वाढला आहे. पुढील काही दिवस तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.