पुणे

सावकारीच्या नावाखाली अत्याचार? मोबाईलमध्ये 200+ अश्लील व्हिडिओ |

महाराष्ट्राला हादरवणारा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे…
कोल्हापुरात सावकारीच्या नावाखाली महिलांवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप उघड झाला आहे. अमित सावंत नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.
पीडित महिलेच्या आरोपानुसार, आर्थिक अडचणीत तिने दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते. काही काळ व्याज भरल्यानंतर पैसे देणं शक्य झालं नाही… आणि इथूनच सुरू झाला अत्याचाराचा काळा खेळ.
आरोपीने महिलेवर जबरदस्तीने अत्याचार करून त्याचा व्हिडिओ बनवला… आणि त्याच व्हिडिओच्या आधारे तिला पुन्हा-पुन्हा धमकावत अत्याचार केल्याचा आरोप आहे.

इतकंच नाही, तर आरोपीच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे… आणि हे व्हिडिओ त्याने मित्रांनाही दाखवल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. गांधीनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
दरम्यान, आणखी महिलांनी पुढे येण्याची शक्यता व्यक्त होत असून, या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.