पुणे

शरद पवार गटाची पुण्यात सीक्रेट मीटिंग! राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना आता मोठा वेग आला आहे. पुण्यात शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची एक गुप्त बैठक पार पडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या बैठकीला जयंत पाटील, अमोल कोल्हे, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे ही बैठक पक्ष कार्यालयाऐवजी एका हॉटेलमध्ये झाली. त्यामुळे या बैठकीचे राजकीय महत्त्व अधिक वाढले आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असल्याचा दावा शरद पवार यांनी यापूर्वी केला होता. दुसरीकडे अजित पवार गटाकडून मात्र अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

दरम्यान, सुनील तटकरे यांनी दोन वर्षांनंतर शरद पवार यांची घेतलेली भेटही चर्चेचा विषय ठरली आहे. पुण्यातील बैठकीत या भेटीवरही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

आता या सर्व घडामोडींमुळे एकच प्रश्न उपस्थित होतोय… राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का?