पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचा खिसा आधीच रिकामा होत असताना… आता आणखी एक धक्कादायक अंदाज समोर आलाय…
3 रुपयांची दरवाढ ही फक्त ट्रेलर असून पुढील काही आठवड्यांत इंधन 10 रुपयांनी महागू शकतं!मध्य पूर्वेतील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या किंमतीतील वाढ आणि तेल कंपन्यांचा तोटा… यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अर्थतज्ज्ञांच्या मते, पुढील 2 ते 3 आठवड्यांत इंधन दरात मोठी वाढ होऊ शकते.इंधन महागल्याचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे.
वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाला, किराणा, गॅस आणि प्रवासही महाग होण्याची शक्यता आहे.
त्यातच अमूल आणि मदर डेअरीने दुधाचे दरही वाढवले आहेत.तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे महागाईत आणखी वाढ होणार असून सामान्य नागरिकांसाठी येणारे दिवस अधिक खर्चिक ठरणार आहेत.
