पुण्यातील खडकवासला परिसरातून एक अत्यंत धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे.
एका भरधाव टाटा पंच कारच्या निष्काळजी ड्रायव्हिंगमुळे 4 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.
शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास MH 25 BH 6489 क्रमांकाची कार खडकवासला धरणाकडे जात असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं.
यानंतर कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या 6 दुचाकी आणि एका रिक्षाला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की कार थेट रस्त्याच्या विरुद्ध बाजूच्या दुकानात घुसली.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 4 वर्षीय यशराज निलेश कांबळे याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यान, पोलिसांनी कार चालक अमोल गेगडे आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलं असून, पुढील तपास सुरू आहे.
संपूर्ण अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद झाला आहे.
