पुणे

रिलस्टार रोहिणी पाराध्येची आत्महत्या | ब्रह्मपुरीतील हॉटेलमध्ये मृतदेह आढळला

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर रिल्समुळे लोकप्रिय झालेल्या 25 वर्षीय रोहिणी पाराध्ये यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ब्रह्मपुरी येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी पाराध्ये आणि त्यांचे पती निलेश पाराध्ये हे सोशल मीडियावर खाद्यपदार्थ आणि सामाजिक विषयांवरील रिल्समुळे प्रसिद्ध झाले होते. लोकप्रियतेनंतर त्यांनी ब्रह्मपुरी येथे ‘हॉटेल ग्रामपंचायत’ नावाचा व्यवसाय सुरू केला होता.
मात्र, काल दुपारी अचानक हॉटेलच्या स्वयंपाकघरात रोहिणी यांनी पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचं समोर आलं. पती निलेश यांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नेमकं आत्महत्येमागचं कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या या जोडप्याच्या आयुष्यात अचानक काय घडलं? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.