पुणे

रंग लावू न दिल्याच्या कारणावरून तरुणास बेदम मारहाण ; कोरेगाव पार्क मधील घटना, चौघा आरोपीस अटक

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
कोरेगाव पार्क या उच्चभ्रु परिसरात रंग लावण्यास नकार दिल्यावरून एका तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. मंगळवारी हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

सिंकदर अजरत शेख (वय 21), अतिक हुसेन सय्यद (वय 21), अलाबक्ष अब्दुलहमीद जमादार (वय 18) व रोहन विनोद रेड्डी (वय 22, रा. सर्व. केशवनगर, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत जुबेर कडलगी (वय 32, रा. कौसरबाग, कोंढवा) यांनी कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जुबेर हे होळी सनानिमित्त रंग खेळण्यासाठी त्यांचा मित्र श्रिलेश नायर याच्याकडे रेसीडन्सी क्लब परिसरात गेला होता. तेथून रंग खेळून ते दोघे परत येत होते. दरम्यान, आरोपींनी त्याला रंग खेळण्यास जाताना देखील रंग लावला होता. तो तेथून परत येत असताना पुन्हा त्याला रंग लावत होते. यावेळी फिर्यादी जुबेर याने त्यांना रंग लावण्यास नकार दिला.

याचा राग मनात आल्याने त्यांनी जुबेर याला शिवीगाळकरून त्याला हाताने मारहाण केली. तसेच, बाजूला पडलेली स्टाईल्सची फरशी बरगडीत व डोक्यात मारून बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. जुबेर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखलकरून चौघांना अटक केली. अधिक तपास उपनिरीक्षक श्रीकांत गुरव हे करत आहेत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x