पुणे

नगरसेवक नाना भानगिरे यांचा पुणे महापालिकेवर यलगार ; प्रभागातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांसाठी करणार आंदोलन ; 13 मार्च पालिकेवर मोर्चा

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
पुणे (प्रतिनिधी)
पुणे महानगरपालिकेच्या पूर्व भागात असलेल्या हडपसर महंमदवाडी प्रभागांमधील विस्कळीत पाणीपुरवठामुळे नागरिक हैराण झाले असून या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेवर मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार आहे, आगामी काळात पाणीपुरवठा सुरळीत केला नाहीत आंदोलनाची दिशा तीव्र केली जाईल असा इशारा नगरसेवक भानगिरे यांनी दिला आहे.
प्रभाग क्रमांक 26 महंमदवाडी – कौसरबाग हा प्रभाग लोकसंख्येच्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रभाव आहे बऱ्याच दिवसांपासून पाणीपुरवठा कमी दाबाने व अवेळी होत आहेत अनेक भागांमध्ये मध्ये रात्री-अपरात्री पहाटे पाणीपुरवठा केला जातो विस्कळीत पाणीपुरवठामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाच्या इतर सर्व प्रभागात दैनंदिन रोज पाणी पुरवठा होत असतो मात्र महंमदवाडी, हांडेवाडी, काळेपडळ परिसरात रात्री बारा ते चार या दरम्यान दर दोन ते तीन दिवसांनी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
आमच्या प्रभागांमध्ये स्वतंत्रपणे रेल्वे गेट, काळेपडळ, जवळ कृष्णा नगर चौक येथे मीटर बसवून पाणी द्यावे म्हणजे नेमके किती पाणी भेटते त्याची माहिती कळेल पाण्याचे मुंढवा – मगरपट्टा बाजूच्या व्हॉलव्ह अवलंबून असल्याने आम्हाला त्यांच्या वेळेत पाणी न देता स्वतंत्र वेळेस पाणी द्या तसेच रामटेकडी टाकीची लेवल नसल्याचे कारण अधिकाऱ्यांकडून पुढे केले जाते त्यामुळे टाकीत जास्तीत जास्त पाणी देऊन टाकीची लेव्हल सांभाळणे गरजेचे आहे, असे सांगून नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे म्हणाले,
व्हॉल्व्ह चालू बंद करण्यासाठी इतर प्रभागात खात्याची माणसे असतात मात्र या प्रभागात ठेकेदाराची कंत्राटी माणसे असल्याने पाणी वाटपात अनियमितता आहे दुरुस्तीच्या कामासाठी खात्याचे बिगारी नसल्याकारणाने दुरुस्तीच्या कामासाठी ठेकेदारावर अवलंबून राहावे लागत आहे त्यामुळे वेळेवर कामे होत नाही 24 x 7 पाणी पुरवठा योजनेची कामे जैन इरिगेशन व कंपनीची कामे बंद असल्याकारणाने या प्रभागातील नवीन जलवाहिनीचे काम पूर्णपणे बंद आहे या प्रभागात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. महानगरपालिकेला टॅक्स भरून इतर नागरिकांना पाणी मिळत नसेल तर याप्रकरणी महापालिकेला जाब विचारला जाईल व शिवसेना स्टाईलने भव्य मोर्चा 13 मार्च 2020 रोजी हजारो नागरिक व महिलांसमवेत काढण्यात येईल व महापालिकेवर यलगार केला जाईल असा इशारा नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी दिला आहे.
पुण्याचा पूर्वभाग महापालिकेत जाऊन अनेक वर्षे झाली तरी अद्याप येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने नगरसेवक देखील हतबल झाले आहेत त्यामुळे नागरिकांच्या हक्कासाठी आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचा इशारा नगरसेवकांकडून देण्यात आलेला आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x