पुणे

महिलांनी मानसिक दृष्ट्या कणखर होणे गरजेचे – प्रा. सुरेखा कटारिया ; आयडियल एज्युकेशन ट्रस्ट च्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
पुणे (प्रतिनिधी)
हडपसर येथील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट येथे आज संस्थेच्या आवारात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सासर व माहेर अशी दुहेरी जबाबदारी पार पाडताना सक्षमतेचा कस लागतो, त्यामुळे पुरुषांच्या बरोबरीने काम करीत असताना महिलांनी मानसिक दृष्ट्या कणखर होणे गरजेचे आहे. असे मत ज्येष्ठ लेखिका व विचारवंत प्रा. सुरेखा कटारिया यांनी याप्रसंगी महिलांना संबोधित करताना व्यक्त केले. यानिमित्ताने संस्थेच्या वतीने परिसरातील घरकाम तसेच महिला सफाई कर्मचाऱ्यांचा, आदर्श महिलांचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. याप्रसंगी स्वी. नगरसेविका सौ. हसीना इनामदार, वानवडी पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर यांनी महिलांना स्वसंरक्षण, शिक्षणाचे महत्व, स्वयंरोजगार आदी विषयावर मार्गदर्शन केले. उपस्थित ५०० हुन अधिक महिलांनी स्त्रीभ्रूणहत्या विरोधी तसेच स्त्रीसन्मानाची शपथ घेतली. संस्थापक अध्यक्ष प्रा. शफी इनामदार, बाळासाहेब घुले, सिलिकॉन एज्युकेशन सोसायटीच्या जबीन सय्यद, उर्दू माध्यम इनचार्ज सौ. शकीला इनामदार, इंग्रजी माध्यम इनचार्ज प्रा. रिफान इनामदार, पोलीस दलातील गीता दिघे, डॉ. अबोली इनामदार हे यावेळी उपस्थित होत्या. सध्या जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरस बद्दल महिलांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने डॉ. श्रुती गोडबोले यांचे कोरोनाचे लक्षणे व त्यापासून वाचण्याचे उपाय मार्गदर्शन आयोजित करण्यात आले, सोबत डॉ. रुकसाना मोमीन यादेखील उपस्थित होत्या. संस्थेने एनव्हिजन डोळ्यांचा दवाखाना च्या संयुक्त विद्यमाने परिसरातील महिलांकरिता मोफत नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात सुमारे १८६ महिलांनी शिबिराचा लाभ घेतला तर २२ महिलांची मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येईल अशी माहिती नेत्रतज्ञ डॉ. अबोली इनामदार यांनी दिली. आयडियल इंग्लिश मेडीयम स्कुलच्या १६ वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल संघाचा जस्ट फॉर किक या राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेत उपविजेते ठरल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन कार्याध्यक्ष फहीम इनामदार, हडपसर विधानसभा काँग्रेस अध्यक्ष प्रा. शोएब इनामदार यांनी केले. मुख्याध्यापक जाकीर शेख, अकबर शेख, मुख्याध्यापिका मलेका पटेल यांनी व्यवस्थापन केले. प्रा. बिल्किस पठाण यांनी सूत्रसंचालन केले, प्रा. आबेदा मुलाणी यांनी आभार मानले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x