पुणे

पुण्यात ‘कॉर्पोरेट जिहाद’चा धक्कादायक प्रकार; विप्रो कंपनीतील हिंदू महिला कर्मचाऱ्यावर धर्मांतरासाठी दबाव!

नाशिकनंतर आता पुण्यातही ‘कॉर्पोरेट जिहाद’चे भीषण वास्तव समोर आले आहे. पुण्यातील नामांकित ‘विप्रो’ (Wipro) कंपनीत काम करणाऱ्या एका हिंदू महिला कर्मचाऱ्याचा धार्मिक छळ करून, तिच्यावर बळजबरीने धर्मांतरासाठी दबाव आणल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद सादिक याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
हिंजवडी आयटी पार्क येथील विप्रो कंपनीत कार्यरत असलेल्या एका हिंदू महिला कर्मचाऱ्याने तिच्याच सोबत काम करणाऱ्या मोहम्मद सादिक या सहकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. सादिक हा गेल्या काही काळापासून या महिलेचा मानसिक व धार्मिक छळ करत होता, तसेच तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी सातत्याने बळजबरी करत होता. या जाचाला कंटाळून अखेर पीडित महिला कर्मचाऱ्याने पोलिसांत धाव घेतली.

हिंदू जनजागृती समितीची पत्रकार परिषद
या गंभीर प्रकरणाची दखल घेत ‘हिंदू जनजागृती समिती’ने पुण्यात तातडीने पत्रकार परिषद आयोजित केली. आयटी क्षेत्रासारख्या उच्चशिक्षित आणि कॉर्पोरेट वर्तुळातही अशा प्रकारे पद्धतशीरपणे हिंदू महिलांना लक्ष्य केले जात असल्याबद्दल समितीने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हा प्रकार म्हणजे ‘कॉर्पोरेट जिहाद’चाच एक भाग असून, अशा प्रवृत्तींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी समितीने केली आहे.