महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पवार कुटुंबात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. प्रश्न उपस्थित केला जातोय… रोहित पवार आजोबा शरद पवार यांच्यापासून वेगळी राजकीय भूमिका घेणार का?
यामागचं कारण म्हणजे, शरद पवार तब्बल ३४ वर्षांनंतर विधानभवनात आले असताना त्यांच्या स्वागतासाठी रोहित पवार उपस्थित नव्हते. त्याचवेळी ते डोंबिवलीतील एका प्रकरणाच्या पाहणीसाठी गेले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांना वेग आला असून, नव्या राजकीय समीकरणांमध्ये काही नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, रोहित पवार यांचं नाव या चर्चांमध्ये नसल्याने ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून रोहित पवार राज्यभर दौरे, आंदोलने आणि जनसंपर्क मोहिमेत सक्रिय दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात ते स्वतंत्र राजकीय भूमिका घेतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र, याबाबत रोहित पवार किंवा शरद पवार यांनी अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे सध्या या केवळ राजकीय चर्चा आणि शक्यता मानल्या जात आहेत.
पवार कुटुंबात पुन्हा बंड? रोहित पवार आजोबांपासून वेगळी भूमिका घेणार? राजकारणात मोठी चर्चा!
