पुणे

सिंहगड इन्स्टिट्यूटच्या अडचणीत वाढ… मारुती नवले विरोधात प्राप्तिकर खात्याकडून 6 खटले दाखल

पुणे : रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन –

 सिंहगड इन्स्टीट्यूटचे अध्यक्ष मारुती नवले यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. त्यांच्यावर प्राप्तिकर विभागाने कर चुकविल्याप्रकणी ६ खटले दाखल केले आहेत.

प्राप्तीकर विभागाने सिंहगड इन्स्टीट्यूटचे अध्यक्ष यांच्या घरी आणि कार्यालयांवर जूलै २०१७ मध्ये छापे टाकले होते. त्यात त्यांनी मोठ्या प्रमाणावर कर चुकविल्याचे समोर आले होते. त्यानी सिंहगड टेक्नीकल एज्युकेशन सोसायटीच्या ४५ कोटी रुपयांचा कर चुकविला होता. याप्रकरणी प्राप्तिकर विभागाचे उपायुक्त आदित्य राय यांनी खटला दाखल केला आहे.

२५ जूलै २०१७ रोजी प्राप्तिकर विभागाने नवले यांच्याशी संबंधित नीमको ट्रेडर्स लि., नीमको स्पीनर्स लि, निमको हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स लि. नीमको अडवर्टायजिंग अँड एन्टरटेनमेंट लि. नीमको इन्वेस्टमेंट अँड फायनान्स लि., जय श्रीराम सुगर अँड अग्रो प्रॉडक्ट्स लि. आणइ आनंद को ऑपरेटिव्ह बँक या सर्व कार्यालयांवर छापे घातले होते. त्याठिकाणांहून अनेक महत्त्वाचे दस्तऐवजही हस्तगत केले होते.

त्यासोबतच कर्वे रोड येथील घर, कंपन्या आणि खात्यांचीही झडती घेतली. तेव्हा वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांमध्ये पैसे मोठ्या प्रमाणावर जमा केल्याचे समोर आले. त्यानंतर रेणूकामाता मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीमध्येही कोट्यवधींचे व्यवहार केले परंतु त्यासंदर्भातील कर किंवा या रकमेचा स्त्रोत त्यांना सांगता आला नाही.

त्यानंतर पुढे प्राप्तिकर विभागाक़डून करण्यात आलेल्या तपासात नवले यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम ही मालमत्ता खरेदी करणे आणि निकमो ग्रुपच्या कंपन्या आणि जय श्रीराम शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यात आली असल्याचे समोर आले.

या रकमेबाबत विचारणा केल्यावर त्यांनी आपले स्पष्टिकरण सादर केले. त्यावेळी त्यांनी वेळोवेळी त्यांनी ही रक्कम उदयसिंह मोहिते पाटील यांच्याकडून मिळाली असल्याचे सांगितले. परंतु याचे पुरावे सादर करण्यात ते असमर्थ ठरले. तर उदयसिंह मोहिते यांच्या मृत्यूनंतरही त्यांना मोठ्या प्रमाणात रक्कम मिळत गेली. तसेच मोहिते पाटील यांचे नातेवाईकाकडूनही कुणी ती रक्कम मागितली नाही. असे प्राप्तिकरच्या तक्रारीत म्हटले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x