दिल्ली

रोड शो दरम्यान केजरीवाल यांच्या कानशिलात, एका संतप्त तरुणाचे दिल्लीत कृत्य

नवी दिल्ली:(रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
लोकसभा निवडणुकीसाठी रोड शो करत असताना सुरेश नावाच्या तरुणाने दिल्लीचे मुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. या तरुणाला केजरीवाल यांच्या समर्थकांनी पकडले असून पोलिसांच्या हवाली केले आहे. यापूर्वीही ४ एप्रिल २०१४ रोजी एका संतप्त तरुणाने केजरीवाल यांच्या कानशिलात लगावली होती.

नवी दिल्लीतील करमपुरा परिसरात अरविंद केजरीवाल यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केजरीवाल त्यांच्या समर्थकांना हात उंचावून अभिवादन करत असताना लाल टी शर्ट घातलेल्या एका तरुणाने कारवर चढून केजरीवाल यांच्या कानशिलात लगावली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे केजरीवालही काही काळ भांबावून गेले. मात्र केजरीवाल यांच्या समर्थकांनी तात्काळ या तरुणाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले. या तरुणाला मोती नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून तिथे त्याची कसून चौकशी केली जात आहे.
केजरीवाल यांच्या कानशिलात लगावणाऱ्या या तरुणाचं नाव सुरेश असं असून तो कैलाश पार्क येथे राहतो. केजरीवाल यांच्यावरील नाराजीतूनच त्यानं हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत. दरम्यान, केजरीवाल यांच्यावरील हल्ला हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
6 months ago

Hi! I’m at work browsing your blog from my new iphone!
Just wanted to say I love reading your blog and look forward to all
your posts! Carry on the excellent work!

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x