दिल्ली

खुशखबर ! 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील ‘कोवाक्सिन’ लस लॉन्च होण्याची शक्यता : ट्रायल पूर्ण करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : भारतात तयार केली जात असलेली कोरोनावरील लस कोवाक्सिन (Covaxin) 15 ऑगस्टपर्यंत लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही लस तयार करत असलेल्या भारत बायोटेक कंपनीला 15 ऑगस्टपर्यंत या लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण करण्याचे निर्देश आयसीएमआर (ICMR) ने दिले आहेत. 7 जुलैपासून क्लिनिकल ट्रायल सुरु करावे, यासाठी उशीर केला जाऊ नये. या ट्रायलचे निष्कर्ष लवकर आल्यास 15 ऑगस्टपर्यंत लस लॉन्च केली जाऊ शकेल, असे आयसीएमआरने म्हटले आहे.भारतात कोरोनाचा कहर वाढला आहे. अशात कोरोनावर औषधाबाबत काही आशेची किरणं दिसू लागली आहेत. भारतात तयार केली कोरोनावर लस शोधण्यात येत असून भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) ने मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे. ‘कोवॅक्सिन’ नावाची लस भारत बायोटेकने इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही)सोबत एकत्र येऊन तयार केली आहे.

हैदराबादची फार्मास्यूटिकल कंपनी भारत बायोटेकने ही लस तयार केली आहे. भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) ने मानवी चाचणीसाठी परवानगी दिली होती ‘कोवाक्सिन’ नावाची लस भारत बायोटेकने इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) सोबत एकत्र येऊन तयार केली आहे. ICMR चे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी एक पत्र जारी केले असून यात 7 जुलैपासून या लसीची मानवी चाचणी सुरु होईल. यामुळे 15 ऑगस्टपर्यंत सामान्यांसाठी लॉन्च केले जावे, असे म्हटले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x