पुणे

विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर शहरात रचनात्मक बदल ; रुपाली चाकणकर बदलून स्वाती पोकळे महिलाध्यक्ष

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराच्या संघटनेमध्ये विविध सेलमध्ये बदल करण्यात आलेले आहेत
पुणे शहरामध्ये राष्ट्रवादीचे महिला युवक विद्यार्थी युवती अल्पसंख्यांक कामगार अशा समाजातील विविध घटकांमध्ये काम करण्यासाठी संघटना व सेल आहेत या संघटनाच्या अध्यक्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज नवीन नेमणुका करण्यात आल्याची घोषणा शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केली.
महिला शहराध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याऐवजी स्वाती पोकळे यांना संधी दिल्याने आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शहराच्या कार्यकारिणी मध्ये रचनात्मक बदल केल्याचे जाणवत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या नव्या नेमणुका करण्यात आल्या.
या नेमणुका करत असताना पूर्वीच्या संघटनेच्या व सेलच्या शहराध्यक्ष यांना त्याच्या विभागाच्या प्रदेश कार्यकारीणी मध्ये प्रमोशन देण्यात आले आहे तसेच काही लोकांना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणी मध्ये बढती देण्यात आली त्यामुळे पूर्वीच्या संघटनेच्या शहराध्यक्षांचा केलेल्या कामाचा अनुभवाचा उपयोग महाराष्ट्र प्रदेश पातळीवर पक्षाला होईल व नवीन चेहऱ्यामुळे संघटना बांधणी अधिक मजबूत करता येईल त्याच प्रमाणे या नेमणुका करताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचे धोरण पक्षाने अवलंबिले आहे त्याचप्रमाणे पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघाचा ताळमेळ या नियुक्त्यांमध्ये करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी दिली.

नवनिर्वाचित अध्यक्षांची नावे पुढील प्रमाणे
राष्ट्रवादी महिला काँग्रेस स्वाती पोकळे
राष्ट्रवादी युवक काँग्रेस महेश हांडे
राष्ट्रवादी विद्यार्थी विशाल मोरे
राष्ट्रवादी युवती काँग्रेस अश्विनी परेरा
राष्ट्रवादी अल्पसंख्यांक काँग्रेस अजीम गुडाकुवाला
राष्ट्रवादी कांग्रेस कामगार सेल राजेंद्र कोंडे
राष्ट्रवादी काँग्रेस पर्यावरण सेल समीर निकम
राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेल प्रमोद रणवरे
राष्ट्रवादी काँग्रेस आयटी सेल ययाती चरवड
राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेल शंकर शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेल सुकेश पासलकर
राष्ट्रवादी काँग्रेस पथारी सेल अल्ताफ शेख

या नियुक्त्या शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी जाहीर केल्या आगामी विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील सर्व मतदारसंघात कार्यकर्त्यांना न्याय देण्याबरोबरच सर्व घटकांना सामावून घेण्याची कसरत साधलेली दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनेच्या अध्यक्षांची नियुक्ती केली ती अचानक झालेली नाही या निवडीची प्रक्रिया सुमारे चार महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती इच्छुक कार्यकर्त्यांकडून या पदांसाठी चे अर्ज पक्षाने रीतसर मागवले होते लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी या नेमणुका होत्या परंतु निवडणुकांच्या धामधुमीत मुळे निर्णय थोडा प्रलंबित झाला होता काही दिवसापूर्वी या सर्व मावळते अध्यक्षांची मीटिंग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे ऑफिस मध्ये झाली होती व त्यामध्ये या सर्व अध्यक्षांना बदलाची कल्पना पक्षाच्यावतीने दिलेली होती.
चेतन तुपे
शहराध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x