हडपसर /पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
दोन दिवसापासून बेवारस अवस्थेत असलेल्या ज्येष्ठ नागरिकास योगेश सूर्यवंशी या सामाजिक कार्यकर्त्यांने तातडीने धाव घेऊन मदत केली, नागरिकांच्या सहाय्याने ससून रुग्णालयात दाखल केल्याने वयोवृद्धाचा जीव वाचला. गोरगरिबांच्या मदतीला तातडीने धावून येणारा योगेश सूर्यवंशी या कार्यकर्त्याच्या सामाजिक कामाचे काळेपडळ परिसरात चांगलेच कौतुक होत आहे.
काळेपडळ रेल्वे गेट जवळ दोन दिवसापासून एक बेशुद्धावस्थेत इसम पडल्याचे नागरिकांनी योगेश सूर्यवंशी या सामाजिक कार्यकर्त्यास फोन द्वारे कळविले तातडीने योगेश सूर्यवंशी यांनी धाव घेत 108 क्रमांकाची अंबुलन्स
बोलावली काही वेळातच या ठिकाणी डॉक्टर वैद्यकीय पथकाच्या मदतीने या बेवारस वयोवृद्धाची तपासणी करून प्राथमिक उपचार करून त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. गुणवंत जाधव. सुनील जाधव राघू कदम गजानन जोडपे यांनी याकामी मदत केली.
या ज्येष्ठ नागरिकावर वेळेवर उपचार झाल्याने जीव वाचला योगेशच्या सामाजिक कार्याबद्दल काळेपडळ परिसरातील नागरिकांनी चांगलेच कौतुक केले.
काळेपडळ रेल्वे क्रॉसिंग हा तसा रहदारीचा परिसर येथे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्या पुढाकारातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले त्यामुळे अनुचित घटनांवर आला बसला आहे, काही गैरप्रकार घडल्यास नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने फार मोठा फायदा झालेला आहे. तसेच याठिकाणी परिसरात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते योगेश सूर्यवंशी नागरिकांच्या हाकेला धावून जात असतो नागरिकांचे नागरी प्रश्न मग रस्ता असेल, वाहतूक, ड्रेनेज, पाणी कोणताही प्रश्न लोकांना आठवण येते या सामाजिक कार्यकर्त्याची, योगेशही सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून या कार्यामध्ये पुढाकार नेहमी असतो.
काळेपडळ रेल्वे क्रॉसिंग वाहतूककोंडी नित्याचीच
काळेपडळ वाहतुकीची कोंडी व वाहनांच्या रांगा ही नित्याचीच बाब होऊन बसलेली आहे वाहतूक पोलिसांच्या संख्येची मर्यादा व त्यांच्या येणारा कामाचा ताण लक्षात घेता योगेश सूर्यवंशी व या परिसरातील अनेक कार्यकर्ते वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सहभाग घेतात व नागरिकांना वाहनचालकांना दिलासा देण्याचे काम करतात योगेश सारख्या तळमळीच्या कार्यकर्त्याची दखल शासन दरबारी घेतली जात नसली तरी परिसरातील नागरिक मात्र या त्याच्या सामाजिक कार्यक्रमाबद्दल मात्र नेहमी कौतुक करत असतात.
Facebook Page Link
#रोखठोकसामाजिकवृत्त#दोन दिवसांपासून बेवारस वयोवृद्धाला मदतीचा हातयोगेश सूर्यवंशीमुळे वृद्धाचे वाचले प्राण,…
Posted by Rokhthokmaharashtra on Saturday, December 21, 2019