हडपसर / पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
प्रभाग क्रमांक 26 महंमदवाडी -कौसरबाग मधील वाहतूक
कोंडी, अपुरे पिण्याचे पाणी, डुकरांचा सुळसुळाट व विविध नागरी प्रश्नांनी नागरिक हैराण झाले असून याकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्यात पुढाकार घ्यावा असे आवाहन करत नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी आज महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रभागात भेट देणार व येथील नागरी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिक प्रश्नांबाबत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्यासमवेत बैठक झाली या बैठकीमध्ये नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी प्रभागातील अनेक समस्या प्रखरतेने मांडल्या या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्या नागरिकांचा अंत पाहू नका असे आवाहन केले
सासरा नगर सय्यद नगर येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून दोन भुयारी मार्गाचे काम सुरू असून हे काम अतिशय संथ गतीने होत आहे त्यातच पर्यायी रस्ते, भूसंपादन झाले नसल्यामुळे येथील भुयारी मार्ग सुरू करण्यात अडचणी येत असून बाधितांना नागरिकांना मोबदला देऊन भुयारी मार्ग तातडीने सुरू करा अशी मागणी यावेळी प्रमोद नाना भानगिरे यांनी केली.
पुढे बोलताना नगरसेवक नाना भानगिरे म्हणाले पुण्याच्या पूर्व भागात असलेल्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये पाण्याचा पुरवठा कायम विस्कळीत असतो, नागरिकांना येथे पुरेसे पाणी मिळत नाही, वारंवार आंदोलने करूनही डुकरांचा प्रश्न अद्याप सोडलेला नाही प्रभागात डुकरे सुरक्षित व नागरिक असुरक्षित झाले आहेत तसेच पर्यायी रस्ता म्हणून पालखी मार्गाचे काम सुरू झाले असून त्यासाठी सात कोटींची तरतूद केली मात्र काम संथ गतीने होत असल्याने येथील नागरी समस्या वाढतच चालल्या आहेत महमंदवाडी येथील सर्वे नंबर 12 मध्ये अमेनिटी स्पेस आहे,येथे 50 लाख येथे तरतूद केलेली आहे, गार्डन आरक्षण टाकून मार्गी लावावे, हॉस्पिटल मध्ये सोयीसुविधा मिळाव्यात, याकडे आयुक्त सौरभ राव यांचे लक्ष वेधले. अनेक सोसायट्या टँकर ने पाणी पाणीपुरवठा होत आहे, लाखो रुपये खर्च होत आहे, पाणीपुरवठा सुरळीत करून हा प्रभाग टँकर मुक्त करावा अशी आग्रही मागणी नगरसेवक भानगिरे यांनी केली.
प्रभाग क्रमांक 26 महंमदवाडी कौसरबाग या प्रभागामध्ये अनेक नागरिक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून वारंवार मागण्या करूनही महापालिका प्रशासन साफ दुर्लक्ष करत आहे मात्र या समस्यांकडे महापालिकेच्या बैठकीत नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी आक्रमक मध्ये मांडत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. आयुक्त या प्रभागात भेट देणार आहेत त्यामुळे नागरी समस्या लवकर मार्गी लागतील अशी आशा निर्माण झाली आहे. पाणी प्रश्नाबाबत सुरळीत करण्यास सूचना येवेळी देण्यात आल्या.
या बैठक प्रसंगी आयुक्त सौरभ राव सर्व विभागाचे अधिकारी, गटनेते पृथ्वीराज सुतार,अविनाश साळवे, विशाल धनवडे, संगीता ठोसर, बाळा ओसवाल, प्राची आल्हाट, श्वेता चव्हाण, पल्लवी जावळे, व शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
Facebook Page Link
https://www.facebook.com/270875513728685/posts/582912125858354/