हडपसर / पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
पुण्याचे पोलिस आयुक्त के. वेंकटेशम, अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलिस उपायुक्त सुहास बावचे, परिमंडळ पाचचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर, यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर येथील प्रगती विद्यालय येथे पोलीस परेडचे आयोजन करण्यात आले होते.
परेड करिता पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर, तसेच परिमंडळ पाच पुणे, शहर हद्दीतील वानवडी, हडपसर, मुंढवा कोंढवा, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी व कर्मचारी तसेच मुख्यालय येथील अधिकारी व कर्मचारी परेड साठी उपस्थित होते.
प्रगती विद्यालयाचे प्राचार्य श्री. करडे, पंधरा शिक्षक व 500 विद्यार्थी देखील यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना वेपन बाबतची माहिती देण्यात आली. समारोपानंतर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून पोलिस दलाचे संचलन हे शिस्तबद्ध असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केले.
तसेच पोलिस खात्यात भरती होण्याची स्फूर्ती निर्माण झाल्याचेही विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले प्राचार्य करडे यांनी सदर परेड पाहून व त्यांची माहिती ऐकून विद्यार्थ्यांना आनंद झाला असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना पोलीस खात्यात भरती होण्याची यासाठी नवी उमेद निर्माण झाल्याचे यावेळी सांगितले.
पुणे शहरातील व उपनगरातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अतिशय सुंदर संचलन व परेड झाली विद्यार्थी हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना यामुळे प्रेरणा मिळाली पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.
रघुनाथ जाधव
वरिष्ठ पोलीस निरीक्षक – हडपसर
Facebook Page Link
https://m.facebook.com/story.php?story_fbid=582052005944366&id=270875513728685