पुणे (प्रतिनिधि)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 24 वैदूवाडी येथे नागरिक, रिक्शा चालक, पेट्रोल पंप व गैस सिलेंडर वितरक कर्मचारी यांना कोरोना संक्रमणपासून संरक्षण व्हावे या मुख्य उद्देशाने मास्क वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे नेते व आमदार अँड. जयदेव गायकवाड, हड़पसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तूपे आणि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हड़पसर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष डॉ.शंतनू जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे.
यावेळी कामगार सेल चे पुणे शहर अध्यक्ष राजेंद्र कोंडे माजी स्वीकृत सदस्य सागरराजे भोसले, संजय शिंदे व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे शहर ओबीसी सेलचे वरिष्ठ उपाध्यक्ष तुकाराम शिंदे यांनी केले.
सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून उपक्रम
अजित पवार राज्याचे कार्यक्षम नेते आहेत, कोरोना डोळ्यासमोर ठेऊन नागरिकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त उपक्रम राबविण्याचे आवाहन केले, या आवाहन नुसार गरजू कामगारांना मास्क वाटप केले, आगामी काळात सुदृढ आरोग्यासाठी उपक्रम आहे.
तुकाराम शिंदे
वरिष्ठ उपाध्यक्ष – ओबीसी सेल राष्ट्रवादी काँग्रेस
