रोखठोक महाराष्ट्र न्यूज ऑनलाइन
पुणे / हडपसर (प्रतिनिधी)
पत्रकारांनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे. समाज जागृतीसाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीचा वापर केला पाहिजे .लेखणी ही धारदार शस्त्रपेक्षा धारदार आहे. बंदुकीच्या गोळी पेक्षाही ती वेधक आहे. म्हणून पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जोपासून पत्रकारिता करावी. विधायक उपक्रमांना प्रसिद्धी देण्याचे काम पत्रकारांनी करावे. पत्रकारांनी आपली लेखणी समाजहितासाठी चालवून समाजाचा दिशादर्शक व मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहावे असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी केले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून एस .एम .जोशी महाविद्यालयात पत्रकार गौरव समारंभात ते बोलत होते.
हा कार्यक्रम मराठी विभाग, प्रसिद्धी विभाग व प्राध्यापक प्रबोधिनी यांनी आयोजित केला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
महाविद्यालयातील विधायक उपक्रमांना सतत पत्रकारांनी प्रसिद्धी दिली आहे, विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून महाविद्यालय सतत प्रगती करीत आहे, गतिशील महाविद्यालयाचे प्रतिबिंब पत्रकार रेखाटत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या पत्रकारांच्या सन्मानासाठी हा उपक्रम आहे. असे गौरवोद्गार प्राचार्य डॉ.अरविंद बुरुंगले यांनी काढले. रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य दिलीप आबा तुपे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पत्रकारांनी जबाबदार नागरिक घडविण्यासाठी लेखणीचा वापर करावा सर्व समाजाला बांधणारा विचार पत्रकारांनी मांडावा. समाज बदलण्याची ताकद पत्रकारांमध्ये आहे, पत्रकारांनी चांगल्या गोष्टींना प्रसिद्धी द्यावी. असे आवाहन अध्यक्षीय भाषणात दिलीप आबा तुपे यांनी केले.
पत्रकार विलास जाधव, सुभाष भारद्वाज, निलेश बडे इत्यादी पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभागाचे प्रमुख डॉ. पांडुरंग भोसले, डॉ. राजेन्द्र ठाकरे, डॉ. संदीप वाकडे यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन प्रा.नम्रता मेस्त्री यांनी केले. डॉ. सरोज पांडरबळे आभार यांनी मानले.
या कार्यक्रमात कृष्णकांत कोबल, अनिल मोरे, अशोक बालगुडे, दिगंबर माने, अमित मेहेंदळे, जयवंत गंधाले, दीपक वाघमारे, राकेश वाघमारे, रागिणी सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला.
