मंबई शहर

मालवण इथं पर्यटनासाठी पत्नीसोबत गेलेल्या मुंबईतील तरुणाचा मृत्यू पॅरासेलिंग करताना समुद्रात बुडाल्यानं घडली दुर्घटना

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाइन
मुंबई, 06 जानेवारी :
कोकणात फिरायला गेलेल्या मुंबईतील युवकाचा समुद्र किनाऱ्यावर अपघाती मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे पर्यटनासाठी अझर अन्सारी पत्नीसोबत आले होते. समुद्रात पॅरासेलिंग सफर करत असताना बोटीतून पडल्यानं त्याच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबईतील साकिनाका इथून अझर आणि त्याची पत्नी 3 जानेवारीला गोव्याला फिरायला गेले होते. दोन दिवस गोवा पर्यटनानंतर दोघेही मालवणमध्ये आले होते. त्याठिकाणी स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्टही त्यांनी केलं. त्यानंतर दुपारी 3 च्या सुमारास ते पॅरासेलिंगसाठी समुद्रात गेले होते. मालवण-दांडी बीचवरून पती-पत्नी गेले. यावेळी त्यांच्यासोबत काही पर्यटक होते. पॅरासेलिंग झाल्यावर ते बोटीत बसले होते तेव्हा समुद्रात पडल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितलं.
अझर अन्सारी समुद्रात पडल्याचं समजताच गाइड आणि इतर लोकांनी त्यांना पाण्याबाहेर काढलं. त्यांच्यावर प्राथमिक उपचार कऱण्याचा प्रयत्न केला गेला. बोट किनाऱ्यावर आणताच त्यांना रुग्णालयातही नेण्यात आलं पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
अझर आणि त्याची पत्नी हिनाबी हे दोघेही इंजिनिअर आहेत. त्यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. अझर आणि हिनाबी दोघेच पर्यटनासाठी आले होते. अझर यांची ही अखेरची सफर ठरली. या दुर्घटनेची नोंद मालवण पोलिसात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x