महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकामागोमाग एक धक्के देण्यास सुरवात केली. त्यांनी फडणवीस यांनी केलेल्या अनेक नियुक्त्या आता रद्द करण्यास सुरवात केली आहे.
ठाकरे सरकार देवेंद्र फडणवीसांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. फडणवीसांनी जाहीर केलेल्या योजनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या स्वयंसेवी संस्था अर्थात एनजीओंच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार असल्याचं कळतंय
योजनांचा आर्थिक लाभ घेतलेल्या एनजीओंनी आर्थिक लाभाचा योग्य वापर, नियम आणि अटींना अनुसरुन केला नसल्यास अर्थ सहाय्य रद्दही होऊ शकतं, अशी माहिती आहे.
ठाकरे सरकार सत्तेवर आल्यापासून फडणवीस सरकारने घेतलेल्या काही निर्णयांना ब्रेक लावले जात आहे तर काही रद्द करण्यात येत आहेत. मेट्रो कारशेड, बुलेट ट्रेन प्रकल्प या मोठ्या निर्णयांचा त्यात समावेश आहे.
दरम्यान, ज्या संस्थांनी राज्य सरकारकडून अर्थ सहाय्य घेतलं आहे, ते सर्व नियम आणि अटींना अनुसरुन आहे का? ज्या प्रमाणात फंड देण्यात आला त्यानुसार त्या संस्थेने काम केलं का? याची चौकशी करणाऱ्याची तयारी ठाकरे सरकारने केली आहे.
