पुणे

गुणवंत कलाकारांच्या पाठीशी मराठी चित्रपट महामंडळ : मेघराजराजे भोसले

मार्गम डान्स अकॅडमीचा 2020 वार्षिक नृत्योत्सव नुकताच गणेश कला क्रीडा मंच येथे संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी वरील मत व्यक्त केले.
मार्गम अकॅडमीने यावर्षी दहाव्या वर्षात पदार्पण केले. यामध्ये सुमारे ३५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. साडेतीन वर्षांपासून ५२ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी, बॉलिवूड, जॅझ, सेमी क्लासिकल, भरतनाट्यम, हिप-हॉप असे इत्यादी नृत्याविष्कार सादर केले. यावेळेस मार्गम च्या संचालिका सौ शिल्पा दानवे-तुरीले, सीईओ गोरक्षनाथ दानवे, आधारस्तंभ राहुल तुरीले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन अकॅडमीचे सीनियर कोरियोग्राफर अतुल भोईर, संकेत ससाणे, समृद्धी झगडे सुमीत सरोदे, अविष्कार व अपेक्षा ठोंबरे यांनी केले. मार्गमच्या सासवड व देवाची उरुळी या शाखेच्या शाखाप्रमुख कु. कादंबरी दानवे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले यांचा पुणेरी पगडी व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
उपाध्यक्ष धनाजी अँकर अभिनेता सुशांत शेलार लवाद सदस्य श्री अनिल गुंजाळ न्यूजचे जितेंद्र वाईकर संचालक वअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे भरारी पथक सदस्य अभिनेते नागनाथ गवसाने, अभिनेत्री कृतिका लोंढे तसेच , पत्रकार सागर बोदगीरे, ऋषिकेश सोत्रिया, अभिनेते प्रशांत बोगम, बांगर साहेब, सहमत खान, ऐश्वर्या देवकुळे या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
भरारी पथकाचे सदस्य नागनाथ गवसाने यांनी यावेळी कला कौशल्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
अध्यक्ष मेघराज राजेभोसले यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले नवोदित कलाकारांच्या कलागुणांना संधी देण्यासाठी चित्रपट महामंडळाकडून येणाऱ्या उपक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणार आहोत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

I do not even understand how I ended up here, but I assumed this publish used to be great

1 year ago

This is really interesting, You’re a very skilled blogger. I’ve joined your feed and look forward to seeking more of your magnificent post. Also, I’ve shared your site in my social networks!

Comment here

2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x