पुणे पिंपरी चिंचवड भागात पुन्हा एकदा स्पा सेंटर मध्ये चालू असलेला देहविक्रीचा व्यवसाय उघडकीस आला आहे. पोलिसांनी हे सेक्स रॅकेट उद्धस्त केलेल आहे. दरम्यान संबंधित 6 तरूणींची सुटका करण्यात आली आहे.
चिंचवड शहरातील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या स्पाईन सीटी मॉलमधील दुकान नंबर 3 आणि 4 मध्ये ‘सिटी स्पा मसाज सेंटर’ या नावाने सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दिपाली मरळ यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या मसाज सेंटरवर छापा टाकला.
सेक्स रॅकेटमध्ये अटक करण्यात आलेल्या चौघांवरही मसाज सेंटरमधील तरुणींना वैश्याव्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच तरुणींनी देहविक्री केल्यानंतर मिळणारी रक्कम चारही आरोपी हे स्वतःची उपजीविका भागविण्यासाठी वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, स्पा चालविणाऱ्या आणि तिथे आढळून आलेल्या राजेश कानुरे,शिवा कोळपे,रितेश घाटकर आणि विक्रम पलांडे या चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.