रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
हडपसर : (प्रतिनिधी)
महाराष्ट्र आरोग्य मंडळ संचालित आणि साने गुरुजी आरोग्य मंडळ संलग्नित सुमतिभाई शाह आयुर्वेद महाविद्यालयामध्ये दि.२७ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक मराठी राजभाषा दिन’ आयोजित करण्यात आला होता.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.निलाक्षी प्रधान यांनी दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा इतिहास ,काव्यवाचन ,गीतगायन ,नृत्य ,विनोदी नाट्य, कथावाचन इत्यादींचे सादरीकरण उत्स्फूर्तपणे केले.यामध्ये शिक्षकांनीही सहभाग घेतला.यानिमित्ताने मराठी काव्यलेखन, कथालेखन व सुलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली.शेवटी आभार प्रदर्शन करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.