पुणे

इमर्जन्सी व्हाटसअप ग्रुपच्या माध्यमातून हडपसर मध्ये सामाजिक उपक्रम ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंच्या मदतीसाठी हडपसरमध्ये एकवटली तरूणाई

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाइन
हडपसर – व्हॉट्सअ‍ॅप हे कधी कुणाचा घात करेल आणि कधी कुणाच्या उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. केवळ जोक आणि टाईमपासच नव्हे तर व्हॉट्सअ‍ॅपवरुन अनेक समाज उपयोगी कामंही केल्याचं आपण पाहिलं आहे.सोशल मीडियाचा विधायक कामासाठीही उपयोग होऊ शकतो , याचा अनेकदा प्रत्यय येतो . अशीच एक सुखद घटना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून हडपसर उपनगरात घडत आहे .

हडपसर उपनगरातील एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपने असंच एक कौतुकास्पद काम केलं सुरु केले आहे. स्वप्नील डांगमाळी यांनी ‘ इमर्जन्सी हेल्प फॉर पीपल ‘ या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मित्र परिवार आणि काही परिचित असलेल्या सामाजिक कार्यकर्ते यांना मदतीचे आवाहन केले .
त्यानंतर मदतीसाठी अनेक हात पुढे आले . मित्रही यावेळी मदतीला धावून आले . सुरवातीला जेवणाची व्यवस्था होईल असे साहित्य, तर पुढे मग किराणा साहित्य आणि रोख रक्कम जमा होत असून ही रक्कम पुन्हा किराणामाल खरेदी करण्यासाठी वापरून खरेदी केलेले साहित्य गरजूंच्या हातात सुपूर्द केले जात आहे. यामुळे हडपसर परिसरात कौतुक होत आहे .

याबाबत अधिक माहिती देताना डांगमाळी सांगतात की ,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंच्या मदतीसाठी हा ग्रुप तयार केला आहे. ग्रूपमधे ८० सभासद असून हडपसर भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा ‘ इमर्जन्सी हेल्प फॉर पीपल ‘ ग्रूप २६ मार्चला तयार केला आहे .आता पर्यंत आपण १०० कुटुंबांना दैनंदिन वापरायचा किराणा साहित्य दिले आहे . दर दिवसाआड ५० कुटुंब शोधून त्यांच्या किराणा सामानाची सोय किराणा किट स्वरूपात करण्यात येत आहे. किमान पाचशे पेक्षा अधिक कुटुंबांना किराणा साहित्य पोचविण्याचा मानस आहे. समाजाकडून मिळालेली मदत समाजातील गरजू कुटुंबाकडे ग्रुपच्या माध्मातूनच पोचवली जात आहे. तसेच आजपर्यंत २५० लोकांना जेवणही दिले आहे.

ग्रुपची स्थापना स्वप्नील डांगमाळी यांनी केली आहे .तसेच अनिकेत राठी, मनीषा राऊत, योगेश गोंधळे , अमोल तोष्णीवाल ,योगेश हिंगणे, अब्दुल शेख, ज्ञानेश्वर कांबळे, महेश ननावरे, शंतनु जगदाळे,डॉ. अश्विनी शेंडे आणि असे अनेक सामाजिक कार्यकर्ते या ग्रुपमध्ये सक्रीय सहभाग नोंदवत आहेत. सर्व नियमांचे पालन करून हडपसर मधील प्रत्येक भागात सर्व्हे करून कमी लोकात, गर्दी टाळून ग्रूप घरपोच साहित्य पोचवत आहे. हडपसरचे लोक भरभरून मदत करत आहेत .

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x