पुणे

रोखठोक महाराष्ट्र न्युज फ्लॅश…. उंब्रजजवळील कार अपघातात पुण्यातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू ; हडपसर परिसरात शोककळा ; हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीने श्रद्धांजली

सातारा (प्रतिनिधी) – पुणे- बंगळुरु महामार्गावर उंब्रजजवळील भोसलेवाडी गावाच्या हद्दीत भरधाव वेगात जाणाऱ्या कारच्या चालकाचा ताबा सुटून कार डिव्हायडरला धडकून झालेल्या भीषण अपघातात डॉक्टर पत्नीसह तिचा पती असे दोघे जण जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी दि. ९ रोजीच्या पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली.

अमित आप्पाजी गावडे (वय३८), डॉ. अनुजा अमित गावडे (वय३५, दोघे रा. ग्रीन फिल्ड सोसायटी, हडपसर, पुणे) अशी अपघातात जागीच ठार झालेल्या पती पत्नीची नावे आहेत. याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सातारा ते कराड लेनवरून कोल्हापूरकडे जाणारी कार (एमएच १२ जेयू.८८९२) ही भोसलेवाडी हद्दीतून भरधाव वेगात जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार महामार्गाच्या डिव्हायडरला धडकून सातारा लेनवर पलटी झाली.

यामध्ये कारमधील अमित गावडे व डॉ. अनुजा गावडे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.

अपघातातील दाम्पत्य त्यांच्या मुलाला कोल्हापूरला आणण्यासाठी जात असल्याची माहिती घटनास्थळावरून समजली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून अपघाताची माहिती समजताच उंब्रज पोलीस, महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, अमित पवार, सलीम देसाई, रमेश खुणे यांनी अपघातस्थळी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य केले. अपघातात दाम्पत्य जागीच ठार झालेच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हडपसर मेडिकल असोसिएशनवर दुःखाची शोककळा पसरली आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x