पुणे

रोखठोक महाराष्ट्र न्युज फ्लॅश…… पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात 17 मेपर्यंत 100 टक्के लॉकडाऊन ; पोलिसांच्या माध्यमातून या भागातील नागरिकांसाठी भाज्या आणि दुध उपलब्ध

 

पुणे: शहरातील करोनाचा सर्वाधिक प्रसार असलेल्या 69 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सोमवारपासून 100 टक्के लॉकडाऊन करण्यात येणार आहे. हे आदेश 17 मेपर्यंत कायम असतील. या कालावधीत केवळ खासगी दवाखाने सुरू ठेवण्यात येणार असून, इतर सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश रविवारी काढले आहेत.

दरम्यान, या भागात गरज भासल्यास महापालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून या भागातील नागरिकांसाठी भाज्या आणि दुध उपलब्ध करून दिले जाणार आहे. मात्र, ते सुध्दा महापालिका आणि पोलिसांच्या माध्यामातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर त्यासाठी त्या भागातील स्थिती लक्षात घेऊन मोकळया जागांमध्ये या सुविधा देण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे आयुक्तांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.

या ठिकाणी असणार 100 टक्के लॉकडाऊन

मंगळवार पेठ-जुना बाजार, पर्वतीदर्शन परिसर 1,2, पर्वती चाळ क्र. 52 झोपडपट्टी, पर्वती दांडेकर पूल झोपडपट्टी, आंबील ओढा कॉलनी परिसर, दत्तवाडी परिसर, शहर मध्यवर्ती भाग कसबा, नाना, भवानी पेठ कसबा – विश्रामबागवाडा, भवानी पेठ कसबा, विश्रामबागवाडा, भवानी पेठ- सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ (पै), गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ(पै), रविवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, महात्मा फुले पेठ (गंज पेठ), गणेश पेठ, कसबा पेठ, घोरपडी पेठ, कोंढवा बुद्रुक काकडेवस्ती, उंड्री, होलेवस्ती कोंढवा, कात्रज, सुखसागरनगर, अंबामाता मंदिर परिसर, कोथरूड-शिवतारा इमारत, चंद्रगुप्त सोसायटी, महाराज कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन दक्षिणेकडील वसाहत , पुणे स्टेशन-ताडीवाला रोड, पर्वती, तळजाई वस्ती 1,2, धनकवडी, बालाजीनगर, गुलाबनगर चैतन्यनगर, आंबेगाव खुर्द जांभूळवाडी साईसमृद्धी परिसर, लोहगाव, कालवडवस्ती नगर रोड, गुलटेकडी, डायसप्लॉट बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर, गुलटेकडी, मीनाताई ठाकरेनगर, प्रेमनगर झोपडपट्टी, येरवडा गांधीनगर 1,2, ताडीगुत्ता, नागपूर चाळ, आदर्श इंदिरानगर, आळंदी रस्ता येरवडा, टी.पी. स्कीम, फुलेनगर, रामनगर वानवडी – रामटेकडी, गोसावीवस्ती, वैदूवाडी वानवडी, सय्यदनगर 1, 2, 3

कोंढवा खुर्द शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, तांबोळी बाजार, मिठानगर, एस.आर.पी.एफ. वानवडी, शिवाजीनगर, कामगार पुतळा, कामगार पुतळा वसाहत, महात्मा गांधी झोपडपट्टी, पाटील इस्टेट, कामगार आयुक्त कार्यालयालगतची झोपडपट्टी, कॉंग्रेस भवन पाठीमागील बाजू, चिंतामणीनगर, मुंढवा सय्यदनगर मगर पेट्रोल पंपाजवळील परिसर, गजानन कॉलनीमधील सर्व सहा गल्ल्या, मुंढवा वेताळनगर परिसर,

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x