रत्नागिरी

केवायसी माहिती देताय सावधान, वृध्देला 76 हजाराचा ऑनलाइन गंडा

रत्नागिरी एका 61 वर्षांच्या वृद्धेकडे केवायसी भरण्यासाठी बँक खात्याचा तपशील मागूम एक लिंक पाठवण्यात आली. त्यातील माहिती भरल्यावर वृद्धेच्या खात्यातून 76 हजार 158 रुपये काढल्याचे लक्षात आले. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मी शर्मा बोलतोय सांगून रत्नागिरीतील वृद्ध महिलेच्या पुण्यातील बँक खात्याची माहिती घेण्यात आली. तुमच्या बँक खात्याचे केवायसी नाही. ते केले नाही तर खाते बंद होईल, त्यामुळे तातडीने केवायसी करा असे सांगत मोबाईलवर पाठवलेल्या लिंकच्या माध्यमातून एका अज्ञाताने रत्नागिरीतील नेवरे येथे राहणाऱ्या वृद्धेच्या बँक खात्यातून 76 हजार 158 रुपये काढले आहेत. उषा अभय खेर (61, रा. नेवरे) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास खेर यांना शर्मा नावाच्या व्यक्तीने 7397692258 व 8617630594 या मोबाईल क्रमांकावरुन फोन तसेच मेसेज केला. यावेळी समोरच्या व्यक्तीने तक्रारदारांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, कर्वे रोड शाखा पुणे येथे असणाऱ्या बचत खात्याची माहिती घेतली. यानंतर खेर यांना तुमच्या बचत खात्याचे केवायसी करणे गरजेचे असून ते केले नाही तर तुमचे बँक खाते बंद होईल असे सांगितले. यानंतर त्यांना मोबाईलवर लिंक पाठवून त्यातील माहिती भरण्यास सांगितले. यावेळी खेर यांनी माहिती भरल्यानंतर त्यांच्या बँक खात्यामधुन 76,158 रुपये काढण्यात आले. खेर यांना ऑनलाइनद्वारे 76 हजाराचा गंडा घालण्यात आला आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x