मुंबई | महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आज ऐश्वर्या बच्चन आणि तिची मुलगी आराध्या हिचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे.
या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून बच्चन कुटुंबासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्याची तपासणी केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी एक सुखद बातमी दिली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. त्यांच्यावर घरीच उपचार केले जाऊ शकतात.
या दोघींना सध्या कोणताच त्रास होत नाही. जर यांना त्रास होऊ लागला तर पुढे रुग्णालयात दाखल करायचे का नाही हा निर्णय घेतला जाईल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.