मुंबई

अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याचे निर्देश : आदित्य ठाकरे सर्वोच्च न्यायालयात

मुंबई – करोना व्हायरस सध्या राज्यात थैमान घालत आहे. अशातच ‘यूजीसी’ने सर्व विद्यापीठांना येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

देशातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने यूजीसीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे, अशी माहिती युवासेनेचे सचिव वरुन सरदेसाई यांनी दिली आहे.

दरम्यान, ‘यूजीसी’ने सर्व विद्यापीठांना येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी यूजीसीने मानक कार्यपद्धती जाहीर केली आहेत. मात्र, राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. या सर्व परिस्थितीत विद्यार्थ्यांचा आणखी संभ्रम वाढला आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x