मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये काही दिवसांपूर्वी वर्णी लागली आहे. याच मुद्यावरून आता जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, गुलाबराव पाटील म्हणाले की,’उद्धव ठाकरे हे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांचं काम जनतेला आवडल्यामुळे हे सरकार पडणार नाही. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहावे,’ असं गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना फडणवीसांना टोला लगावला.
दरम्यान,महाराष्ट्रात हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास गेल्यामुळे भाजपला ते खूप जिव्हारी लागले आहे. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा परत येण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे म्हटले जात आहे.