पुणे

“श्रीराम चौक परिसरात रस्त्यावर खड्डेच खड्डे” “लवकरात लवकर खड्डे बुजवून रस्त्याचा काम करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल:- अझरुद्दीन सय्यद”

(हडपसर – प्रतिनिधी )

प्रभाग क्रमांक २६ मधील श्रीराम चौक हंडेवाडी रोड येथील राॅयल कॅफे समोरील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. दोन्ही साईड ने रस्त्यावर खड्डे पडल्याने कित्येक छोटे मोठे अपघात रोज घडत आहे. संपूर्ण रस्ताच खड्ड्यांनी व्यापला असल्याने अनेक गाड्या या खड्ड्यांत अडकून पडतात. पाऊस पडल्यावर या खड्ड्यात मोठ्याप्रमाणात पाणीचा साठा होत असून नागरिकांना याच पाण्यातून वाट काढावी लागते. पाणी साचल्याने दुर्गंधी पसरलेली आहे.
खड्ड्यांमुळे वाहनचालक, सामान्य नागरिक, महिलांना नाहक त्रास होत आहे.
हा रास्ता हडपसर हंडेवाडी ला जोडणारा मुख्य रस्ता आहे,रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे.
या संबंधी दोन वेळा महानगरपालिकेला तक्रार करण्यात आली परंतु या विषयी प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे.
लवकरात लवकर श्रीराम चौक परिसरातील रस्त्यावरील बुजवून सदरील रस्त्याचा काम करावे अशी मागणी मनसे युवा नेते अझरुद्दीन सय्यद यांनी सहाय्यक आयुक्त हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय यांना निवेदनाद्वारे केली आहे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x