पुणे

सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश परदेशी यांची #राष्ट्रवादीकाँग्रेसपार्टी मध्ये एन्ट्री #चित्रपट व #सांस्कृतिक #विभागाची सांभाळणार धुरा

पुणे, दि.१९/ऑगस्ट/२०२०

सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश परदेशी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश होणार असल्याची माहिती प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली.
गेल्या काही दिवसात अनेक कलाकार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संस्कृती विभागांमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत.

अभिनेते गिरीश परदेशी यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (न्यू-दिल्ली) येथून कला क्षेत्रातील प्रशिक्षण घेतलेले आहे. आजपर्यंत जवळपास २५ हून अधिक चित्रपटात काम केले असून त्यांचे गाजलेले चित्रपट म्हणजे फॉरेनची पाटलीन, मर्मबंध,साम-दाम-दंड-भेद, बेरीज वजाबाकी इत्यादी तसेच त्यांनी तेरा हून अधिक नाटकांमध्ये देखील काम केलेले आहे तोच परत आलाय, बाकी इतिहास भूमिका ई.तसेच आपण त्यांना अनेक मालिकांमधून देखील पाहिले आहे आज पर्यंत त्यांनी १४ मालिकांमध्ये काम केले आहे या सुखांनो या,वहिनीसाहेब,कादंबरी इत्यादी. याचीच पोचपावती म्हणून आजवर त्यांना बाराहून अधिक अवॉर्ड मिळाले आहेत झी गौरव, झी अवॉर्ड यासारख्या नामवंत चॅनल्स व कार्यक्रमांमध्ये त्यांना गौरवण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कार्यशैली, कलावंतांना नेहमीच आदराचे स्थान,त्यांचा योग्य सन्मान तसेच सुप्रिया सुळे या देखील महिलाना मनसर्वच क्षेत्रात योग्य स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात व अजित पवारांची कार्यशैली सर्वांना आवडणारी व परिचित आहे. लॉककडाऊनचा प्रचंड मोठा फटका सिनेमासृष्टी व कालावंतांना बसला असून, कलाकारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून,हे कलाकारांचे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने सोडवले जातात हे सर्वांना परिचित आहे.

तसेच या लॉकडाऊन मध्ये राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून नाट्यपरिषदेला मदत तसेच तमाशा कलावंत,लोककलावंत असे सगळे मिळून महाराष्ट्रात सुमारे ४ हजार कलाकारांना मदत केली आहे.कलाकारांचे प्रश्न समजून घेणारा व त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये त्यांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विश्वास कलाकारांच्या मनामध्ये रुजत आहे.याच कारणामुळे सर्व क्षेत्रातील कलाकारांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभाग आपलासा वाटायला लागला असून अनेक दिग्गज कलाकार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये प्रवेश करत असल्याचेही कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
11 months ago

Amazing graphics and fun games. A variety of games.
Jᥙst tɑke care.

11 months ago

I love this app bеcause they offer havе diffeгent methods
tߋ play sports betting.

Comment here

2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x