पुणे

भाजपच्या हडपसर विधानसभा अध्यक्षपदी संदीप दळवी ; कोंढवा येथे मेळाव्यात केली घोषणा

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
हडपसर / पुणे (प्रतिनिधी)
भाजपा शहर अध्यक्षांच्या निवडीनंतर संदीप दळवी हडपसर विधानसभा मतदार संघाच्या भाजप अध्यक्षपदी युवा नेतृत्व संदीप दळवी यांची निवड झाली. संघटनात्मक निवडणूक प्रमुख धीरज घाटे यांनी आज कोंढवा येथे संघटन पर्व कार्यकर्ता मेळाव्यात संदीप दळवी यांचे हडपसर विधानसभा भाजप अध्यक्ष म्हणून नाव जाहीर केले.

भाजपचा संघटनात्मक निवडणूक कार्यक्रम २५ डिसेंबर पूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र जानेवारी उजाडला तरी या निवडी सुरूच आहेत. पुणे शहरातील आठ मतदार संघांपैकी तीन मतदार संघाच्या अध्यक्षांच्या निवडी गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानंतर हडपसर विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. येथील जीवन जाधव आणि भुषण तुपे यांनीही पक्ष संघटनेकडे अध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली होती. मुलाखतीही दिल्या होत्या. मात्र आज दळवी यांच्या निवडीने या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे.
भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर, भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेविका रंजना टिळेकर, नगरसेविका उज्वला जंगले, वृषाली कामठे, मनीषा कदम, मतदार संघाचे मावळते अध्यक्ष सुभाष जंगले, रवी तुपे, भूषण तुपे, वंदना कोद्रे, जितेंद्र भंडारी, अण्णा धारवडकर, अमित घुले, इम्तियाज मोमीन, नितीन होले, गणेश घुले आदीजण यावेळी उपस्थित होते.

तेरा आघाड्या आणि बूथ प्रमुख यांच्या निवडी लवकरच जाहीर करून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील, पक्षाची ध्येय धोरणे डोळ्यासमोर ठेऊन कार्य करणार
संदीप दळवी
अध्यक्ष – भाजप हडपसर विधानसभा

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x