मुंबई

#खासदार_डॉ_अमोल_कोल्हे_यांच्या_कामाचा_झपाटा_फेसबुक_पेजवर_प्रश्नांना_फोडली_वाचा_दिला_प्रतिसाद

मुंबई – प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आपल्या कार्यपद्धतीमुळे नेहमीच चर्चेत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची भूमिका साकारल्यामुळे अमोल कोल्हे महाराष्ट्रात परिचित झाले. त्यामुळे, महाराष्ट्रभर त्यांचे कार्यकर्ते आहेत. आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी ते आपलं कर्तव्य बजावताना दिलेला शब्दही पाळण्याचा अटोकाट प्रयत्न करताना दिसून येते.

खासदार कोल्हे दिल्लीतील बैठका, गाठीभेटी किंवा कामासंदर्भातील पाठपुरावा सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेला सांगतात. मात्र, डॉ. कोल्हेंच्या एका कृतीने नेटीझन्सकडून त्यांचे कौतुक होत आहे. तर, अनेकांना त्यांच्या या तत्परतेमुळे प्रश्नाची उत्तरे मिळाली आहेत. कारण, अमोल कोल्हेंनी चक्क फेसबुक पेजवर आलेल्या कमेंट्सना उत्तरे दिली आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्रातील सर्व खासदारांची अर्थसंकल्प 2020 या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचा वृत्तांत खासदार कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन शेअर केला होता. त्यासोबतच, बैठकीचे फोटोही शेअर केले आहेत.
या बैठकीस उपस्थित राहून शिरुर लोकसभा मतदारसंघातील पुणे-नाशिक महामार्गाचे सहापदरीकरण, किल्ले शिवनेरीवर रोपवे व शिवसृष्टी, भक्ती शक्ती कॅरिडोअर, पुणे-नाशिक रेल्वे संदर्भात एमआयडीसीची भूमिका, चाकण येथे विमानतळाची निर्मिती, मतदारसंघातील धरणाच्या बॅकवॉटरमध्ये लेक, डिस्ट्रीक्टच्या धरतीवर सहकारी तत्वावर पर्यटनपूरक व्यवस्था असे मतदारसंघातील विविध मुद्दे मांडण्याची संधी मिळाली, असे कोल्हेंनी सांगितले. कोल्हेंच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करुन प्रश्न विचारले. त्यावर, कोल्हेंनी समाधानकारक उत्तरे दिली.

कोल्हेंना मिळालेल्या कमेंटपैकी एकाने चक्क गावचं भीषण वास्तव त्यांच्यासमोर मांडलं. आमच्या गावात रेंज नाही, जायला रस्ता नाही, अशी कमेंट एकाने केली होती. त्यावर, कुठे राहता आपण? असा प्रश्न कोल्हेंनी विचारला. त्यानंतर, संबंधित व्यक्तीने गावाचे नाव सांगितले आहे. मात्र, कोल्हेंचा हा तत्परपणा अनेकांना भावला. कमेंटवरील प्रश्नांना उत्तरे देणारा एकमेव नेता, असेही काहींनी म्हटले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x