मुंबई – देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सुरुवातीपासूनच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रसाराला अटकाव करण्यात अद्यापतरी यश आलेलं नाहीये. अशातच आज राज्याचे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
शिंदे यांनी कोरोना लक्षणे जाणवल्याने काल आपली कोरोना चाचणी करून घेतली होती. त्या चाचणीचा अहवाल आज प्राप्त झाला असून यातून शिंदे यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती स्वतः एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली असून आपली प्रकृती बारी असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1309049815171567620?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1309049815171567620%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=https%3A%2F%2Fm.dailyhunt.in%2Fnews%2Findia%2Fmarathi%2Fdainikprabhat-epaper-dailypra%2Fnagaravikasmantriekanathshindeyannakoronachibadha-newsid-n217158156
आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर याबाबत माहिती देताना ते लिहतात, ‘काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती…’