मुंबई

साखरपुड्याच्या पार्टीसाठी बोलावून मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार; मुंबईतील अंधेरीमधील हॉटेलमध्ये घडला प्रकार

मुंबई :  – मैत्रिणीला साखरपुड्याच्या पार्टीसाठी म्हणून बोलावून तिच्यावर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. मुंबईतील अंधेरी-कुर्ला रोडवरील एका हॉटेलमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर तिन्ही आरोपी पसार झाले आहेत.

या प्रकरणी पीडित तरुणीने तीन आरोपींविरोधात 15 नोव्हेंबरला तक्रार नोंदवली आहे. आरोपींनी आपल्याला व अन्य दोन महिलांना पार्टीसाठी निमंत्रित केले होते. त्यानंतर आरोपींनी आपल्यावर बलात्कार केला, असे पीडित तरुणीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. एका इंग्रजी दैनिकाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

तीन आरोपींपैकी एकाने त्याच्या साखरपु़ड्याच्या निमित्ताने 8 नोव्हेंबरला ही पार्टी आयोजित केली होती, असे तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले. महिलेच्या तक्रारीनुसार, मुख्य आरोपीने तिला दारू पिण्यासाठी जबरदस्ती केली. पार्टीला आलेल्या अन्य दोन मैत्रिणी थोड्यावेळाने तिथून निघून गेल्या. पण मुख्य आरोपी आणि दोन मित्र तिथेच थांबले होते. त्यांनी हॉटेलमधल्या खोलीत नेऊन आपल्यावर बलात्कार केला. पीडित महिला घरी पोहोचल्यानंतर तिने लगेच याबद्दल कुटुंबीयांना काही सांगितले नाही. पण अखेर तिने हिम्मत करून शनिवारी कुटुंबीयांना तिच्यासोबत काय घडले? ते सांगितले. कुटुंबीय तिला लगेच तक्रार नोंदवण्यासाठी जवळच्या पोलीस ठाण्यात घेऊन गेले. ही तक्रार नंतर सहार पोलीस ठाण्यात वर्ग केली आहे. कारण गुन्हा घडला, ते हॉटेल सहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. ‘आरोपी फरार असून, आम्ही लवकरच त्यांना अटक करू. वैद्यकीय तपासणीसाठी पीडित महिलेला रुग्णालयात पाठवण्यात आले. आम्ही रिपोर्टची वाट पाहत असल्याचे सहार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x