मुंबई

फोटोंबरोबर छेडछाड करत ४२ वर्षीय फॅशन डिझायनरचे शोषण

चित्रपटांमध्ये काम देतो असं सांगून ४२ वर्षीय महिलेचे शोषण करणाऱ्या एका व्यक्तीला पुणे पोलिसांनी अठक केली आहे. हिंदी चित्रपटांमध्ये काम देण्याच्या बहाण्याने आरोपीने ४२ वर्षीय फॅशन डिझायनरची स्क्रीन टेस्ट घेतली. मात्र या स्क्रीन टेस्टदरम्यान घेतलेल्या फोटोंच्या आरोपीने गैरवापर केला. या फोटोंबरोबर छेडछाड करत त्याने एडीटींगच्या मदतीने ते पॉर्नोग्राफीक इमेजेस म्हणजेच अश्लील फोटो तयार करुन महिलेला धमकी देण्यास सुरुवात केली. माझ्याशी शरीरसंबंध ठेवले नाही तर हे फोटो व्हायरल करु अशी धमकी ही व्यक्ती फॅशन डिझायनरला देत होती.

पुणे मिररने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राहुल श्रीवास्तव असं असून तो मूळचा केरळचा आहे. श्रीवास्तव आणि तक्रार करणारी महिला हे दोघेही व्हॉट्सअपवरील एका फॅशन इंडस्ट्रीशीसंबंधित ग्रुपमध्ये आहेत. तेथूनच त्यांची ओळख झाली आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून संवाद होऊ लागला. श्रीवास्तवने या माहिलेला चित्रपटांमध्ये काम देण्याचे आमिष दाखवले. हा चित्रपट आपणच दिग्दर्शित करणार असल्याचे सांगून कामासंदर्भात बोलण्यासाठी आपण भेटूयात असं श्रीवास्तवने या माहिलेला सांगितलं. साळुंखे विहार परिसरातील एका हॉटेलमध्ये श्रीवास्तवने या महिलेची भेट समीर नावाच्या व्यक्तीशी घडवून आणली. त्यानंतर काही दिवसांनी श्रीवास्तवने या महिलेला फोन करुन तुझं काम पाहून समीर प्रभावित झाला आहे असं सांगितलं. चित्रपटासाठी करार करण्याआधी एक स्क्रीन टेस्ट केली जाईल. स्क्रीन टेस्टसाठी तुला मुंबईला यावं लागेल असंही या श्रीवास्तवने या माहिलेला सांगितलं.

श्रीवास्तवने मुंबईला येण्यासंदर्भात माहिती दिल्यानंतर या महिलेने आपल्याला मुंबईला येणं शक्य होणार नाही असं स्पष्ट केलं. त्यानंतर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी व्हिडिओ कॉल सुरु असतानाच आरोपीने या महिलेचे काही फोटो घेतले आणि नंतर त्यात एडिटींगच्या सहाय्याने छेडछाड केली.

नंतर हे छेडछाड केलेले फोटो या महिलेला पाठवून श्रीवास्तवने तिला, “माझ्याबरोबर शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला तर मी हे फोटो व्हायरल करेल,” अशी धमकी दिली. या धमकीला भीक न घालता या महिलेने श्रीवास्तवकडे दूर्लक्ष केलं असता त्याने दोघांच्या कॉमन व्हॉट्सअप ग्रुपवर या फोटोंपैकी एक फोटो शेअर केला. श्रीनिवासच्या या कृत्यानंतर या महिलेने तो व्हॉट्सअप ग्रुप सोडला आणि त्याचा नंबर ब्लॉक केला. मात्र त्यानंतरही श्रीनिवास वेगवेगळ्या क्रमांकावरुन या महिलेला तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवत होता. अखेर या प्रकरणाला वैतागून महिलेने पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली.

पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायदा आणि कलम ३५४ (विनयभंग करणे), ३५४ (अ) लैंगिक अत्याचार करणे, ३५४ (ड) (नजर ठेवणे) आणि ५०९ (अपमानास्पद वागणूक देणे) या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x