पुणे

इंद्रायणी नदी (मोशी) ते चांडोली सहापदरीकरणाच्या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात – खासदार डॉ. अमोल कोल्हे

पुणे – राष्ट्रीय महामार्ग ६० (जुना ५०) वरील इंद्रायणी नदी (मोशी) ते चांडोली या टप्प्यातील १७/७०० कि. मी. लांबीच्या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून चाकणचा तळेगाव चौक आणि एमआयडीसी चौकातील वाहतूक कोंडी फुटण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची प्रतिक्रिया शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

चाकणमध्ये होणारी वाहतूक कोंडी हा लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरला होता. त्यामुळे निवडणुका पार पडल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी सातत्याने नाशिक फाटा ते चांडोली या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली होती. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासमवेत बैठका घेतल्या. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः केंद्रीयमंत्री गडकरी यांच्याशी चर्चा केली. पालकमंत्री पवार यांची शिष्टाई आणि डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश येऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इंद्रायणी नदी (मोशी) ते चांडोली या १७/७०० कि. मी. लांबीच्या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू केली. सुमारे ६४८.८४ कोटींच्या या कामासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२१ असून १८ जानेवारी रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन मार्च महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

नाशिक फाटा ते मोशी या पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील लांबीतील भूसंपादनाच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याने या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाचे दोन भाग करण्याची भूमिका डॉ. कोल्हे यांनी लावून धरल्यामुळेच चाकणच्या तळेगाव चौक व एमआयडीसी चौकातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असून या पाठोपाठ नाशिक फाटा ते मोशी या लांबीतील भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्याची लवकरात लवकर निविदा काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गांची कामे हा माझा प्राधान्याचा विषय असून मावळचे आमदार सुनील शेळके व माझ्या संयुक्त प्रयत्नांमुळे तळेगाव-चाकण रस्त्याच्या अस्तित्वातील लांबीचे रुंदीकरण करण्यासाठी ३०० कोटींच्या प्रस्तावाला केंद्रीयमंत्री गडकरी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे भविष्यात राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार व सुनील शेळके यांच्या सहकार्याने तळेगाव-चाकण आणि पुणे-नगर रस्ता हे दोन अतिशय महत्त्वाचे असणारे रस्ते येत्या काही काळात आपण मार्गी लावणार आहोत असे सांगून डॉ. कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री पवार आणि केंद्रीयमंत्री गडकरी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
3 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

I savor, lead to I discovered exactly what I used
to be having a look for. You have ended my four day lengthy hunt!
God Bless you man. Have a great day. Bye

1 year ago

I ɑll the time used to reaⅾ post in news papers but noww аs I аm a user оf web tһus frߋm now I am using net fоr posts, thanks
to web.

Look into my web blog: amazon products review (Debbra)

1 year ago

I’m nott sure whегe you are getting your info, bᥙt good topic.

I neеds tߋ spend s᧐me timе learning morе orr understanding mⲟre.
Thanks for excellent іnformation I ѡaѕ looking ffor this infоrmation foг mmy mission.

Ꮮߋok at mʏ web blog real review emf defense

Comment here

3
0
Would love your thoughts, please comment.x
()
x