पुणे

अखिल भारतीय हिंदू नाथपंथी महासंघाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने टेनिस क्रिकेट टूर्नामेंट चे आयोजन

पुणे हडपसर :

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील अखिल भारतीय हिंदू नाथपंथी महासंघाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर शेवाळवाडी येथे 23/1/2021/, 24/1/2021 रोजी शनिवार भव्य टेनिस क्रिकेट टूर्नामेंट चे आयोजन करण्यात आले होते. या टूर्नामेंट साठी संपूर्ण महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमधून एकूण अठरा संघ सहभागी झाले होते .भव्य टेनिस बॉल टूर्नामेंट दोन दिवस शेवाळवाडी भागांमध्ये प्रशस्त मैदानावर खेळली गेली. जगदंब प्रतिष्ठान क्रिकेट क्लब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली धडाकेबाज संघ म्हणून महासंघ चषकाचे मानकरी जगदंब प्रतिष्ठान क्रिकेट संघ ठरला.या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते सतीश जगताप, प्रशांत सुरसे, अनिल मोरे, सामाजिक कार्यकर्त्या मयुरी बामणे, मा.ग्रामपंचायत सदस्य सहदेव सावंत आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.कोथरूड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण आणि सेझ पालन हारदीप तांदळे यांच्या हस्ते जगदंब प्रतिष्ठान क्रिकेट संघाला प्रथम बक्षिस रोख ₹.25555, महासंघ चषक देऊन गौरवण्यात आले. द्वितीय क्रमांकाचे बक्षिस रोख रक्कम 11,111 हजार,चषक सामाजिक कार्यकर्त्या मयुरी बामणे व महासंघाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा रेखा चव्हाण यांच्या हस्ते घोडपदेव क्रिकेट संघ मुंबई यांना देण्यात आले.
तृतीय बक्षिस कोल्हापूर(जयसिंगपूर)आणि गायवाडी मुंबई या दोन संघांना एकत्रित रोख 7777 रु. तरूण उद्योजक अभिषेक माळवे यांच्या हस्ते देण्यात आले.उत्कृष्ट गोलंदाज नितीन जगताप यांना सोलापूर महासंघाचे अध्यक्ष अमरनाथ इंगवले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संपूर्ण राज्यातून खेळाडूने उत्तम खेळ दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली. अनिल चव्हाण ,राहुल सावंत, सागर चव्हाण आदि समाज बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x