पुणे

बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीसह तडीपार आरोपी जेरबंद – हडपसर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

पुणे /हडपसर (विशेष क्राईम प्रतिनिधी)
बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या हडपसर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. गुन्हेगाराकडून एक लाख 34 हजार चा मुद्देमाल जप्त केला आहे, याचदरम्यान कारवाईत तडीपार आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले आहे.
अजय दिलीप लाळगे उर्फ डिवाइन 26 वर्ष राहणार सर्वे नंबर 13 भगतसिंग कॉलनी गोंधळेनगर हडपसर असे आरोपीचे नाव असून आरोपीची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे असा माल मिळून आला आहे.
हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसर मधील गोंधळे नगर लोखंडी पुलाजवळ बुलेटवर बसलेला एक सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडे पिस्टल आहे अशी माहिती कळाली. या बातमीच्या आधारे सूचना दिल्यानंतर या ठिकाणी हडपसर पोलिसांनी जाऊन सापळा रचून या आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध हडपसर पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा महाराष्ट्र पोलीस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई करत असताना तडीपार आरोपी विनीत रवींद्र इंगळे (वय 21 वर्षे) रा. राहुल कॉलनी, एकविश्व कॉम्प्लेक्स जवळ, सातववाडी, हडपसर पुणे हा तडीपारी आदेशाचा भंग करून परिसरात फिरत असल्याने त्यासही अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते हडपसर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम गुन्हेचे पोलीस निरीक्षक राजू अडागळे, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, पोलीस नाईक सैदोबा भोजराव, समीर पांडुळे, संदीप राठोड, अविनाश गोसावी, नितीन मुंडे, पोलीस शिपाई शशिकांत नाळे, शाहिद शेख, प्रशांत टोणपे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखिल पवार यांच्या पथकाने केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास हडपसर पोलिस चौकीचे उपनिरीक्षक एस. बी. जाधव करीत आहेत

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x