पुणे

युनिटी फॉर फ्रीडमच्या वतीने क्रीडा खेळाडूंचा सन्मान

पुणे ः प्रतिनिधी

पुण्यातील नामवंत राज्य व राष्ट्रीय पॉवर लिफ्टर व वेट लिफ्टर खेळाडूंचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन युनिटी फॉर फ्रीडम फाउंडेशनच्या माध्यमातून अध्यक्ष व राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू भगवान वायाळ यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. लष्करमधील फिशर जिमन्याशियम येथे क्रीडाखेळाडूंच्या सन्मान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी आंतराष्ट्रीय पॉवर लिफ्टर खेळाडू शाम सहानी, आंतरराष्ट्रीय कार रेसर संजय टकले, शिवसेना उपशहर प्रमुख डॉ. अमोल देवळेकर, आंतराष्ट्रीय पॉवर लिफ्टर शाम अकोलकर, संजय शर्मा, श्रीकांत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी साक्षी धुमाळ, अनुष्का सरडे, रोहित शर्मा, सचिन थोरात, विक्रांत ससाणे, रॉनी डिसोझा, शिवम मेहर, मोहित नगरकर या आठ खेळाडूंना प्रशस्तीपत्र, सन्मान पदक व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष जमशेद करकरिया, सूर्यनारायण केटरर्सचे शुभम पवार, आदित्य वायाळ, संस्थेच्या सचिव प्रतिभा वायाळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x