पुणे

पूर्व भागातील लसीकरण सावळा गोंधळ थांबवा नाहीतर शिवसेनेशी गाठ… नगरसेवक नाना भानगिरे यांचा पालिका व जिल्हा प्रशासनाला इशारा

हडपसर / पुणे (प्रतिनिधी)
अस्त्यावस्त लसीकरणाचा गोंधळ थांबवून त्याचे योग्य नियोजन करा आणि पुण्याच्या पूर्व भागातील हडपसर विभागाकडे लक्ष द्या, जम्बो हॉस्पिटल सुरु करा अन्यथा शिवसेनेशी गाठ आहे हे लक्षात असू द्यात असा कडक इशारा शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांनी आज महापालिका आणि जिल्हा प्रशासनालाही दिला आहे.
तुमच्या ढिसाळ नियोजनामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मानहाणी होते आणि आम्ही ती खपवून घेणार नाही असेही नाना भानगिरे यांनी म्हटले आहे. लसींची उपलब्धता त्याबाबतची खात्री करून लसीकरण नियोजन व्यवस्थित करावे असे त्यांनी म्हटले आहे.
गेली कित्येक दिवस लसीकरण होताना मनमानी पध्द्तीने लसींचे वाटप केल्याने नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना देखील मनस्ताप झाला आहे. खरे तर आता पर्यंत ४५ च्या पुढील व्यक्तीचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित होते, पण तुटवड्याचे कारण पुढे आल्याने नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी हे सारे सहन केले आता १ मे पासून १८ वर्ष वयाच्या पुढील सर्वानांच लसीकरण करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. 18 वयाच्या पुढील संख्या लक्षात घेता याबाबत योग्य खबरदारी घेऊन आताच आपल्याकडे लसी कशा पोहोचतील आणि याबाबत ची खात्री करवून नियोजन करावे, शक्यतो तातडीच्या प्रसार माध्यमांची मदत घेऊन याबाबतची माहिती जनतेपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत स्वयंसेवी संस्थापर्यंत पोहोचवावी . पोलिसांची मदत घ्यावी. प्रत्येक भागातील नगरसेवक कार्यकर्ते मदतीस तयार आहेत. प्रशासनाने त्यांच्या मदतीने लसीकरणाचे नियोजन केले तर व्यवस्थित होऊ शकेल. असे भानगिरे यांनी म्हटले आहे.
1 मे पासून लसीकरण मधील सावळा गोंधळ थांबला नाही शिवसेना स्टाईल ने प्रशासनाला जाब विचारण्यात येईल असा इशारा ही नगरसेवक भानगिरे यांनी दिला आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x